01 english

02 marathi

[Back to the archive]
Jan 1, 2016

Are Mumbai's gaothans and slum the same?-import-01

type
publisher
place
Tags
Suvarta

Automated Translation:
Are Gaothans and slums in Mumbai the same?

Father Correa - Suvaarta, Jan 2016

Some people have undertaken the hassle of attempting to bring the gaothans and slums of Mumbai under the same category. An attempt is being made to put the slums and villages in Mumbai on the same scale. It is not clear whether they know exactly what slums are and what Gaothans are. If it is said that the Gaothans in Mumbai are the branches of this 'Mumbai-tree'; there’s no option but to say that the slums are the parasites attached to the Mumbai-tree'. Today's and yesterday's Mumbai city stands on many branches called Gaothans, the houses and doors of the people of these Gaothans, their lands, their farms, their fields of flowers and fruit trees: is Mumbai and its suburbs not standing on this very foundation?

There was a time when this present-day financial capital of India was given to the British by the Portuguese on the occasion of the marriage of Princess Catherine of Braganza in 1561, at an annual rent of five pounds. Today, even if you count out five thousand pounds, you won't get a meter of space! Koliwadas and Gaothans have been around in Bombay ever since rent in Bombay itself was five pounds. Outsiders did not come to Bombay. It was a land of fields and tracts, rivers and creeks, and streams and canals. There were bullock carts and cattle. Their owners lived in Gaothans.

The year 1665 dawned. Shivaji plundered Surat. The East-India Company lost confidence in the port of Surat, which had hitherto been considered “secure.” The Company shifted their epicentre to Mumbai, where they put all their trust. Mumbai began changing at a rapid pace.

Today's Colaba is the old Koliwada. From that Koliwada to Thane and Bhayandar there were Koliwadas along the coast and Gaothans in the interior. This was the ancient Mumbai-tree of that time. Mazgaon, Parel, Bhoiwada, Sewri, Wadala, Worli, Sion, Bandra, Kalina, Juhu, Vesave, Parle, Irla, Kurla, Marol, Thane, Ghodbunder, Poisar, Dahisar, Bhayander were the Gaothans in this Mumbai-tree. The bigger Gaothans were allotted numbers. E.g. The Gaothan in Juhu was big, so it was Gaothan no. 1, Gaothan no. 2, Gaothan no. 3 - these sections were made. Like the Gaothans in Juhu and also in other big Gaothans there were divisions. People of diverse religions lived harmoniously in these Gaothans, practising dairy-farming and agriculture as their occupations.

Today, if we go to an area like Andheri and start 'searching' to see the old evidence of the land, the names we see from the older generations are those of the residents who lived in the native Gaothans. Among them were East Indian Christians, Kunbis, Agris, Prabhus, Chaukalshi - Paachkalshi and Sheshvanshi Kshatriya Bhandaris, Panchal, Kansars, Brahmins etc. Today lands under the same railway tracks we thunder along to reach our workplaces belonged to the same residents of the Gaothans. The airport from which we fly domestically and abroad belonged to the people of the Gaothans.

OCR text:
मुंबईतील गावठाणे वझोपडपट्ट्या एकाच मापात ?

फादर कोरिया

मुंबईतील गावठणांना व झोपडपट्ट्यांना एकाच छत्राखालीआणण्याचा उपद्व्याप काही. लोकांनी अलीकडे चालू केला आहे.मुंबईतील गावठणे आणि झोपडपट्ट्या ही वस्तिस्थाने एकाच तराजूतघालण्याचा प्रयत्न केला जात आहे. झोपडपट्टया म्हणजे कायं आणिगावठणे म्हणजे काय, हे त्यांना नक्की कळले आहे की नाही, हे स्पष्टहोत नाही. मुंबईतील गावठणे ही या 'मुंबावृक्षा'च्या फांद्या आहेत असेजर म्हटले; तर झोपडपट्ट्या या त्या “नगर-वृक्षा'ला लागलेली'बांडगुळे' आहेत असेच नाही का नाईलाजाने म्हणावे लागणार?आजची व कालची मुंबई नगरी गावठण नामक अनेक फांद्यांवर उभीआहे, या गावठणांतील लोकांची जी कौलारू घरे-दारे आहेत, त्यांचाजो जमीनजुमला होता, शेती-भाती होती, फुलबागा आणि फंळबागा 'यांचे मळे होते:तत्यांच्यावर आज मुंबापुरी व तिची उपनगरी यांचा संसारनाही का उभा राहिला?

एक काळ असा होता की, हीच आजची भारताची आर्थिकराजधानी १५६१या वर्षी राजकन्या कॅथरिन द ब्रेगेन्झा हिच्याविवाहाप्रसंगी पोर्तुगिजांकडून जेव्हा ब्रिटिशांच्या हातात आंदण म्हणून- दिली गेली, तेव्हा पाच पोंड वार्षिक भाडेपट्टीने तिची किंमत मोजली* जात होती. आज पाच हजार पौंड मोजले तरीदेखील तिच्यापाठीवरची एक मीटर जागा मिळंणार नाही! जेव्हा पाच पौंड ही. मुंबईची भाडेपट्टी होती; त्या वेळेपासून मुंबईमध्ये कोळीवाडे होते.गावठणे होती. बाहेरचे लोक मुंबईमध्ये तोवर आलेले नव्हते. मुंबई हीशेता-शिवारांची, वाड्या-खाड्यांची., व ओढ्या-नाल्यांची होती.बैलगाड्यांची होती. गुराढोरांची होती. ह्यांच मालक गावठणांत राहात.

१६६५ साल उजाडले. शिवांजीने सुरत लुटली. आजवर“सुरक्षित म्हणून समजल्या गेलेल्या सुरत बंदरावरचा ईस्ट-इंडियाकंपनीचा विश्वास उडाला. कंपनीवाल्यांनी आपली नजर 'उपवर'पुंबईकडे वळविली. त्यांनी आपली सारी भिस्त मुंबई बंदरावर ठेवली.त्यांनी त्यांची -वखार मुंबईला हलवली. भरधाव वेगोने मुंबईचे चित्रपालटत गेले.

आजचा कुलाबा म्हणजे जुना कोळीवाडा. त्या कोळीवाड्यापासूनठाण्यापर्यंत आणि भायंदरपर्यंत समुद्रकिनाऱ्यालगत कोळीवाडे आणिआतमध्ये गावठणे वसलेली होती. हा होता त्या काळचा पुरातनमुंबावृक्ष. या मुंबईवृक्षात माझगाव, परेल, भोईवाडा, शिवडी,वडाळा, वरळी, सायन, वांद्रे, कलिना, जुहू, वेसावे, पार्ला, इर्ला,कुर्ला, मरोळ, ठाणे, घोडबंदर, पोयसर, दहिसर, भायंदर अशीगावठणे होती. पैकी जी गावठणे मोठी होती, त्यांना नंबर देण्यातआलेले आहेत. उदा. जुहू येथील गावठण हे आकाराने मोठे. त्यामुळेत्या गावठणाचे गावठण नं. १, गावंठण नं. २, गावठण नं. ३ असेविभाग पाडण्यात आले आहेत. जसे जुहू येथील गावठणाचे तसेचअन्य मोठ्या गावठणांतही त्या त्या गावठणाचे विभाग पडलेले आहेत.या गावठणांत विविध धर्मांची मंडळी गुण्यागोविंदाने वास्तव्य करूनहोती. शेती-भाती करीत होती. दूध-दुभत्यांचा धंदा करीत होती.

आज आपण अंघेरीसारख्या मामलेदार कचेरीत जाऊन जरबसलो आणि जमिनीचे जुने पुरावे पाहण्यासाठी 'सर्च' घेऊ लागलोतर त्यात आपल्याला जुन्या पिढीतील जी नावे दिसतात ती या मूळगावठण लोकवस्तीत राहणाऱ्या रहिवाशांचीच. त्यांच्यात ईस्ट इंडियनख्रिश्चन होते, कुणबी होते, आगरी होते, प्रभू होते, चौकळशी -पाचकळशी होते व शेषवंशी क्षत्रिय भंडारी होते. पांचाळ, कंसार,ब्राह्मण आदि . समाजांचे बांधवही होते. मुंबईभरच्या ज्या प्रवासीवाहनांनी धाडधाड धावत आज आपण आपल्या कार्यालयांत जातो,त्या रेल्वे रळाखालच्या जमिनी गावठणांतील याच लोकांच्या होत्या.ज्या विमानतळावरून आपण देशी-परदेशी उड्डाण करतो त्या जागा यामूळ गावठणातल्या लोकांच्या होत्या. आज ज्या ठिकाणी मुंबईची.इस्पितळे, शैक्षणिक केंद्रे, वस्तुसंग्रहालये, क्रीडा-कलाकेंद्रे आदी उभी

सुवार्ता जानेवारी २०१६ । ९३

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.