Automated Translation:
Ports of inconvenience
22nd June 2014
For hundreds of years, Mumbai has been an important port in sea trade. Ever since Mumbai's seven separate islands weren’t connected by bridges, sea routes have always been used for internal travel. Jetties are an integral part of Mumbai's transport system. After many years of hassle-free service, last week a boat collided with the jetty in Versova and one person was killed. On that occasion, when our representatives reviewed the condition of these jetties and their facilities, a shocking reality came to light that there were no bare minimum facilities for passengers as well as for the ferries. Along with this, in the first rains, the water crossed the beach limit and came all the way uptil Shivaji Park. In this crashing of waves, Dadar suffered a lot of damage - here is an eyewitness account of it.
Reporting by: Sameer Karve, Nitin Chavhan, Rajesh Churi, Hemant Satam
_____
Vesave (Versova)
What the Mumbaikar knows as Versova, is originally Vesave, the tip of the Western suburb of Andheri. Making our way through the alleys of Vesave Koliwada, we reached the port. It is said that Vesave Port is the second largest fishing port in India, second only to Kerala. But only the fishermen are aware of the reality. However, if we look at the poor state of the port, this statement seems to be an exaggeration. Plastic waste greets you as far as the eye can see along the creeks and coastlines.
The Vesave Creek and coastline are plagued by plastic pollution. Drains, sewers from Malad, Goregaon, Dindoshi, Charkop and Gorai meet the creek. From it waste water, plastic and waste material enters the creek. Due to this garbage, the depth of the bay has decreased. The silt and plastic waste has become a major headache for the fishermen. Years of non-silting of the creek has resulted in decline of fish production and this is affecting the fishermen badly. Four to five fishing boats sink every year due to silt.The boats have suffered lakhs worth of financial loss because of this silt. In 2006, for the first time, an attempt was made to remove the silt from the creek. But those efforts were insufficient. In 2012, an attempt was made to remove the silt with a dredger. Only 300 cubic meters of silt was removed in a day. Given the speed with which the dredging began, it would have taken years. Also since the dredger was 60 years old, the work was not going fast enough. After that it was decided to remove the sludge with a suction cutter. However, the work was stopped due to lack of a sludge carrier. In March this year, the work of removing the silt was going on for about 50 days. Although around 47,550 tonnes of silt has been removed, there are still lakhs of tonnes of silt in the creek, informs Prithviraj Chandi, Founder President of Vesava Koli-Machchimar Nakhwa Mandal (Trawlers)._____
Suffocating amidst the crowds: Gateway of India
As the Gateway of India is an international tourist attraction, it is always swarming with tourists at any given time of the day. Even when waves are high in monsoon, there is a crowd of tourists enjoying harbor cruises for launch trips and going to Gharapuri Island. The entire area is thronged with launch and catamaran passengers from October to May, as during this period the launch and catamaran services of three different operators to Mandwa (Alibaug) run from 6 am to 6 pm at intervals of fifteen minutes to half an hour. This is where the problem begins. There is a constant stream of tourists visiting the Gateway, as well as water transport passengers. After the November 26 2008 attacks, barricades were to be set up before entering the Gateway premises, and one has to go through police metal detectors before entering. The tourists on the boats are often carrying their luggage and it is not humanly possible to check all of them due to time constraints. Still preliminary checking happens, and continues and in that too, tourists are included. There are cases of some people offering bribes to security personnel to escape the serpentine queues.
The courtyard in front of the Gateway used to be a garden maintained by Mahindra, with a shed. Children and elders could sit in the shade, shielded from the sun. But now there is no place to escape the sun.
The real problem was on Jetty No. 2. This jetty has not been repaired in the last several years. The steps are worn out all over, and there is a broken stone at the bottom. On the steps itself, hooks have been installed and the launch ropes are tied to them. When the launch catamaran traffic increases, the launches are parked here in a line closely stuck to each other and sometimes the passengers have to cross as many as four launches to reach the jetty. It is nerve-wracking at most to step into a moving launch from a very narrow path with luggage. The launch drivers need to make the launches depart as per the clock. A number push towards the byrog collections to launch the launchers in a clock wise manner... ...
Bhaucha Dhakka also comes under the purview of the Mumbai Port Trust. But the control of all the launches operating here is with the Maharashtra Maritime Board. In front of the gateway, pontoons are floating jetties for passengers..
_____
There are no lounges or simple benches anywhere. For the elderly, going up and down stairs is akin to having one’s bones broken.
_____
Plan to build the port
Vesave is a natural port. Fishermen have been demanding the construction of this port for many years. In the year 2011, the state government took this decision. A total cost of Rs.125 crore was agreed for these ports. As the central government has shown readiness to bear the cost of 75 crores and the state government has shown readiness to bear the cost of 50 crores, the plan has been prepared. CIEFI, an organization based in Bangalore conducted the survey for the port in 2011. Technical reports like construction of the port, Preliminary Study reports, Techno-economic feasibility reports, model study etc have been sent to 12 various departments of the Centre including Environmental, Maritime, CRZ, etc.
______
Only 300 boats remaining
Until the year 2000 there were 650 fishing boats in the Vesave harbour. Due to decline in fish production, many fishermen closed their businesses. At present, only 300 boats are left at this port and that too, they are barely managing their businesses. Vesave Port comes under the jurisdiction of the Maritime Board, Port Trust and the Collectorate. But since there is no coordination between these three authorities, no plan is being made from building a port to promoting the fish business.
_____
Shipping services hit
Vesave to Madh is a water transport service. About 25-30,000 passengers travel daily by these boats. There is no jetty for the fishermen in Vesave, just as there is no jetty for the boat service. So Markar is playing with the lives of thousands of passengers every day. Every month there are incidents of one or two passengers falling into the water and being stranded. The Port Trust levies a tax of 50 paise per passenger. But the safety of passengers is nowhere to be found. Same thing is with fishing boats. A tax of one and a half rupees per sack- per one tonne is collected from the fishermen. But basic facilities are also lacking. Diesel, water, ice, and fish baskets still have to be carried on the shoulders in the traditional way. Since the year 2006 the government has promised to refund the VAT on diesel. But this has not been implemented yet.
_____
The ‘maach’ lie deserted
A ‘maach’ is an open space at a height for drying fish. There were hundreds of such tent like ‘maach’ owned by the fishing community in Vesave Harbour. With the passage of time, the nets have started to disappear due to the decline in fishing activities. Many landlords sold their lands to builders. Therefore, many small buildings and bungalows have now stood in place of the ‘maach’.
OCR text:
असुविधांचे धक्के
२२ जुन २०१४
शेकडो वर्षांपासून मुंबई हे जहीतिक व्यापारात महत्त्वाचं बंदर आहेच. पण मुंबईची सातस्वतंत्र बेटं पुलांनी जोडलेली नवृती तेव्हापासून मुंबईत अंतर्गत प्रवासासाठी समुद्रमार्गाचावापर होतोय. जेट्टी हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील एक अविभाज्य भाग. गेली अनेक वर्षेया जेट्टी गपगुमान सेवा बजावताहेत, पण गेल्या आठवड्यात वर्सोव्याला एक बोट जेट्टीवरआदळली आणि त्या अपघातात एकाचा मृत्यूही झाला. त्यानिमित्ताने या जेट्टींची स्थिती, लेथीलसोयीसुविधांचा आमच्या प्रतिनिंधींनी आढावा घेतला, तेव्हा प्रवाशांसाठी तसेच फेरीबोटींसाठीकिमान सुविधाही अस्तिंत्वा नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. त्याचसोबतपहिल्याच पावसात समुद्र किनाऱ्याच्या मर्यादा ओलांडून पाणी शिवाजी पार्कपर्यंत आले.लाटांच्या या माऱ्यात दादरच्या मोठे नुकसान झाले, त्याचाही आखो देखा हाल.
वार्तांकन : समीर कर्वे, नितीन चव्हाण, राजेश चुरी, हेमंत साटम
_____
वेसावे ( वर्सोवा )
मुञईकर ज्याला वर्सोवा म्हणतो ते मूळचे वेसावे. पश्चिम उपनगरातील अंधेरीचे शैवटचे... वेसावे कोळीवाड़्च्या गल्ल्यांमधून वाट काढत आम्ही बंदरावर पोहेचलो. असेम्हणतात की, मासेभारीत केरळनंतर वेसावे बंदर दुसऱ्या क्रेमांकाचे आहे. खरे खोटे मच्छिमारचजाणोत. मात्र बंदराची बकाल-अवस्था पाहिली तर हे विधान अतिशयोक्तीचे वाटते. खाडीआणि किनारपट्टीवर जिथवर नजर जाईले तिथपर्यंत प्लास्टिकचा कचरा तुमचे स्वागत करतो.
वेसावे खाडी आणि किनारपट्टी प्लास्टिकच्या प्रदूषणाने वेढली आहे. मालाड, गोरेगाब,दिंडोशी, चारकोप, गोराई येथील नाले, गटार खाडीला मिळतात. त्यातून सांडपाणी, प्लास्टिकआणि. टाकाऊ वस्तु खाडीत येतात. या कचर््यामुळे खाडीची खोलो कमी झाली आहेवेसांवे बंदरात्त गाळ आणि प्लास्टिकचा कचरा ही मच्छिमारांसाठी मोठी डोकेदुखी ठरलीआहे. वर्षांनुवर्षे खाडीतील गांळ न काढल्याने मत्स्य उत्पादन आटले आहे. त्याचा फटकामच्छिमारांना बसतोय. गाळामुळे दरवर्षी चार ते पाच मासेमारी बोटी बुडण्याच्या घटना घडतात.बोटींचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान या गाळामुळे झाले आहे. २००६मध्ये पहिल्यांदाखाडीतील गाळ काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते प्रयत्न अपुरे ठरले. २०१२मध्ये ड्रेझरने गाळप काढण्याचा प्रयत्न झाला. एका दिवसाला फक्त ३०० घन् मीटर गाळ काढला जात होता. ज्यार्गतीने गाळ काढण्याचे काम सुरू झाले होते, ते पाहता अनेक वर्षे लोटली असती. शिवायड्रेझरही ६० वर्ष जुना होता. त्यामुळे कामाला गती येत नव्हती. त्यानतर सक्शन कटरने गाळकाढण्याचे ठरविण्यात आले. मात्र गाळवाहक बाज नसल्याने काम रखडले. यंदाच्या मार्चमध्येतब्बल ५० दिवस गाळ काढण्याचे काम सुरू होते. सुमारे ४७ हजार ५५० टन गाळ काढण्यातआता असला तरी खाडीत अजूनही लाखो टन गाळ आहे, अशी माहिती वेसावाकोळी-मच्छिमार नाखवा मंडळाचे (ट्रॉलर्स) संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज चंदी देतात.
_____
गर्दीत घुसमटलेला
गेटवे ऑफ इंडिया
गेटवे ऑफ इंडिया हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटन आकर्षण असल्यानेइथे कोणत्याही काळात पर्यटकांची तोबा गदी असतेच. माम्सुनमध्येलाटांची उसळी मोठी असतानाही हार्बर क्रुझचा आनंद लुटणाऱ्या पर्वटकांचीलाँचफेऱ्यांसाठी तसेच घारापुरीला जाण्यासाठी गर्दी होतीच. हा सगळापरिसर ऑक्टोबर ते मे या काळात तर लाँच व कॅटमरानच्या प्रवाशांनी तुडुंबभरलेला असतो, कारण या काळात मांडवा (अलिबागोसाठी तीन विविधऑपरेटर्सच्या लाँच व कॅटमरान सेवा पहाटे सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतपंधग मिनिटे ते अर्ध्या तासाच्या अंतराने सुरू असतात. समस्या इथूनच सुरूहोते. केवळ गेटवेला भेट द्यायला आलेले पर्यटक आणि जलवाहतुकीचेप्रबासी यांची दरवेळी सरमिसळ होते. २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यानंतरगेटवेच्या प्रांगणात प्रवेश करण्यापूर्वीच बॅरिकेड्स उभारून पोलिसांच्यामेटल डिटेक्टरच्या तपासणीतून आत शिसरवे लागते. जलबाहतूक प्रवाशांकडूनअनेकदा सामानसुमान असते व त्या सर्वांची तपासणी वेळेच्या गणितानुसारशक्यच नसते. तरीही जुजबी तपासणी. सुरू असते व त्यातच पर्यटकहीअसतात. वाढत्या रांगांमुळे काहींची लाच चुकंल्याच्याही घटना आहेत.
गेरवेसमोरील प्रांगणात पूर्वी महिंद्रतर्फे राखले गेलेले उद्यान होते, तेथे एक शेडहोती. मुलांना, ज्येष्ठांना उन्हापासून संरक्षण मिळायचे आता मात्र उन्हापासूनसंरक्षण मिळेल, अशी कोणतीही सावलीची जागा येथै नाही.
खरी समस्या ही दोन क्रमांकाच्या धक्क्यावर होते. गेल्या अनेक वर्षात याधक्क्याची दरुस्तीच झालेली नाही. पायऱ्या तर पार झिजल्याच आहेत, शिवायतळाशी एक फुटका दगडही आहे. -पायऱ्यांवरच करड्या रीवण्यात आल्याआहेत व त्यात लोंचेसचा दोर अडकवला जातो. लाँच कँटमयनची पहदारीवाढली की, एकाला एक खेटून इथे लाँच उभ्या राहतात व कधीकधी चार-चार लाँच पार करून प्रवाशांना धक्का गाठावा लागतो. यात अगदी निमुळत्यावाटेवरून हलत्या लाँचमध्ये सामानसुमानासह पाऊलं टाकणे हे जिवावरबेतणारे असते. लाँचवाल्यांना घड्याळाच्या काट्यानुसार लाँच सोडण्यांची... बय्रोग संकलांच्या दिशेस एक नंबरचा धक्का ......
भाऊचा ... धंककाही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंखत्यारीतयेतो. पण इथे चालणाऱ्या सर्व लॉचैसॅचे नियंत्रण मात्र महाराष्ट्र मेरिटाइमबोर्डाकडे येते. गेटवेसमोर पॉन्टून्स म्हणजे तरंगते धक्के उभारून प्रवासी...
_____
लाऊन्ज किंवा साधी बाकेही कुठे नाहीत. वयोवृद्धांसाठी तर धवक्यावरीलपायऱ्यांची चढउतार करणे हा पाय मोडन घेण्याचाच प्रकार भाडे
_____
वषर बांधण्याची योजना
नैशञावेन नैमर्गिक बंदर आहे. गेल्या अनेकवर्षांपासुन हे बंदर बांधून काढण्याची मागणीमच्छिमारांकडून केली जात आहे. सन२०११मध्ये तसा निर्णय राज्य सरकारने घेतला.एकूण १२५ कोटी रुपये खर्चाच्या या बंदरांसाठीमान्य झाले. केंद्र सरकारचे ७५ कोटी आणिराज्य सरकारने ५० कोटी खर्च उचलण्याचीतयारी दाखवल्याने त्रशी योजना तयार झालीआहे. बंदरासांठी सीआयईएफआय या बंगळूरयेथील संस्थेने २०१रमध्ये सर्व्हे केला. बंदराचेबांधकाम, पूर्व अभ्यास. अहवाल टेवनोईकॉनॉमो फिजिबिलिटी रिपोर्ट, मॉडेल स्टडीआढी तांत्रिक अहवाल केंद्राच्या पर्यावरण,..., सीआरझेडसह विविध १२विभागाकडे हा अहवाल पाठवण्यात आलाआहे.
______
३०० बोटी शिल्लक
वेसावे बंदरात सन २००० पर्यंत६५० मासेमारी बोटी होत्या.मत्स्य उत्पादन घटल्याने अनेकमच्छिमारांनी व्यवसाय बंद केला.सध्या या बंदरावर फक्त ३००बोटी शिल्लक राहिल्या असूनत्याही कसाबसा आपला व्यवसायसांभाळत आहे. वेसावे बंदर मेरीटाइम बोर्ड, पोर्ट ट्रस्ट आणिजिल्हाधिकारी कार्यालयाच्याअख्यात्यारित येते. मात्र या तिन्हीयंत्रणांमध्ये समन्वय नसल्यानेबंदर उभारणीपासून मत्स्यव्यवसायाला चालना देण्यापर्यंतकोणतीही योजना आकारालायेत नाही.
_____
जलवाहतूक सेवा धक्क्याला
वेसावे ते मढ जलवाहतूक सेवा आहे. दररोज सुमारे २५ते ३० हजार प्रवासी वाहतूक या बोटीतून होते. वेसावेतमच्छिमारांसाठी धक्का नाही तसाच बोटसेवेसाठीहीनाही. त्यामुळे हजारो प्रवाशांच्या जिविताशी मरकारदररोज खेळते आहे. महिन्याला. एंक-दोन प्रवासीपाण्यात पडून जायबंदी होण्याच्या घटना घडतअसतात. पोर्ट ट्रस्ट प्रत्रि प्रज्रासी ५० पैसे कर आकारते.मात्र प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. तीच बाबमासेमारी बोंटींची. आहे. एका बोरीमागे-एक टन, दीडरुपये कर आकारणी मच्छिमारांकडून केली जाते. मात्रप्राथमिक सुविधांचीही वानवा आहे. डिझेल, पाणी,बर्फ, माशांच्या टोपल्या अद्याप पारंपरिक पद्धतीनेखांद्यावरून वाहुन न्याव्या लागतात, डिझेलवरेलव्हॅटचा परंतावा परत देऊ असे आश्वासन २००६ पासूनसरकारमार्फत दिलें जात आहे. अद्याप अंमलबजावणीझालेली नाही.
_____
माच ओस पडले
माच म्हणजे मासे सुकविण्यासाठी उंचावर तयार केलेलीजागा. वेसाचे बंदरात मांडवासारख्या आकाराचे मच्छिमारसमाजाच्या मालकीच्या असे शेकडो माच होते. मासेमारीव्येंबसायाला अवकळा आल्याने काळाच्या ओघात माचओस पडू लागले आहेत. अनेक माचमालकांनी आपल्याजांगा बिल्डरांना विकून टाकल्या. त्यामुळे माचच्या जागीआता अनेक न्नहान इमारती आणि बंगले उभे राहिले आहेत.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.