Automated Translation:
We will help the fishermen - Assurance of Ministers Subhash Desai and Jayant Patil
Malad, 4 (Correspondent) A delegation headed by General Secretary of Maharashtra Fisheries Action Committee Kiran Koli met Ministers Subhash Desai and Jayant Patil about the loss faced by fishermen due to storms, heavy rains and natural calamities. During the visit, the action committee made demands such as declaration of drought and financial assistance to fishermen who are facing natural difficulties like farmers, immediate loan waiver to fishermen, refund of value added tax on diesel oil should be given immediately. The state government will provide all the necessary help to the fishermen, said the Minister of Agriculture Subhash Desai and Jayant Patil.
Subhash Desai informed that Chief Minister Uddhav Thackeray has recently ordered the concerned authorities to submit a report regarding the losses suffered by farmers and fishermen in Konkan. He also said that he will hold a meeting with the Chief Minister soon. Jayant Patil said that he is aware of the serious condition of the fishermen. He assured them that he will soon hold a meeting with the concerned authorities and help the fishermen like the farmers. The delegation of Maharashtra Fishermen Action Committee included Vice President Moreshwar Patil, Mumbai President Parashuram Meher and others.
OCR text:
मच्छीमारांना मदत करणार!
मंत्री सुभाष देसाई ब जयंत पाटील यांचे आश्वासन
मालाड, ता. ४ (बातमीदार) वादळ, अतिवृष्टी ब नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीबाबत मंगळवारी (ता. ३) महाराष्ट्र मरच्छोमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मंत्री सुभाष देसाई व जयंत पाटील यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, शेतकऱ्यांप्रमाणे नैसर्गिक अडचणीत असलेल्या मच्छीमारांसाठी आओळा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी मच्छीमारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कर परतावा तत्काळ देण्यात यावा, अशा मागण्या कृती समितीने केल्या. यावर राज्य सरकार मच्छीमारांना आवश्यक ती सर्व मदत करेल, असे श्वासन मंत्री सुभाष देसाई व जयंत पाटील यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच संबंधित अधिकाऱ्यांना कोकणातील शेतकरी व मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली. तसेच याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी मच्छीमारांच्या गंभीर स्थितीची आपल्याला कल्पना असल्याचे सांगितले. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊनशेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना मदतमिळवून देऊ, असे आश्वासनत्यांनी दिले. महाराष्ट्र मच्छीमार कृतीसमितीच्या शिष्टमंडळामध्ये उपाध्यक्षमोरेश्वर पाटील, मुंबई अध्यक्ष परशुराम मेहेर आदींचा समावेश होता.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Suspendisse varius enim in eros elementum tristique. Duis cursus, mi quis viverra ornare, eros dolor interdum nulla, ut commodo diam libero vitae erat. Aenean faucibus nibh et justo cursus id rutrum lorem imperdiet. Nunc ut sem vitae risus tristique posuere.