01 english

02 marathi

00

All

01

Fishing

02

Policies & Regulations

03

Infrastructure

04

Environment

05

Development

06

Protests

07

Politics

08

Risks

January 1, 2016

Are Mumbai's gaothans and slum the same?

आहेत त्यांसाठी उपलब्ध झालेल्या जागा या गावठणातील लोकांनीच दिलेल्या आहेत. शिवाजीपार्कसारखी काही मैदाने आहेत, त्या मैदानाच्या कानाकोपऱ्यांत आकाशाला गवसणी घालणारी नारळाची काही जुनी झाडे आजवरही उभी आहेत. शतकभराच्या त्या खड्या साक्षीदारांना जर आपण विचारले की, शंभर वर्षांपूर्वी तुमची लागवड कुणी केली, तर ते निश्चितच अंगुलीनिर्देश करतील गावठणांत वस्ती करणाऱ्या या शेतकरी व बागायतदार बांधवांकडे. आज मुंबईतील रेल्वे, तमाम रस्त्यांचे जाळे याच बांधवांच्या शेता- शिवारांतून व बागायती-वाड्यांतून गेलेले आहे. त्यांच्या बऱ्याचशा जमिनी बाहेरगावांहून आलेल्या लोकांनी विकत घेतल्यामुळे गावठणातील लोकांची पूर्वापार वडिलोपार्जित घरे तितकी शिल्लक राहिली आहेत. ही गावठणे मुंबई इलाखा निर्माण होण्यापूर्वी ठाणे लोकलबोर्डाच्या अधिपत्याखाली होती. त्यांना ठाणे लोकलबोर्डाचे घर नंबर देण्यात आले होते. मुंबई इलाखा आल्यानंतर व मुंबईचा सिटी सर्वे झाल्यानंतर सदर घर क्रमांक बदलले. काल-परवा मुंबापुरी कॉर्पोरेशन झाल्यानंतर; तर चित्र अधिकच बदलले 'आणि गावठणांतील एकसूरी धगधगत्या जीवनाला एक प्रकारची उदासीनता आली. बाहेरून आलेले लोक अधिक सुशिक्षित होते. गावठणातील लोक बिचारे अशिक्षित होते. गावठणातील लोक आपली मोडकीतोडकी मायबोली मराठी बोलत. बाहेरून आलेली मंडळी इंग्रजीतून संभाषण करीत. सरकारी कार्यालयांत त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या होत्या. त्याच्या बळावर या धनिक लोकांनी गावठणातील मूळ रहिवाशांच्या जमिनी विकत घेतल्या - प्रसंगी त्या लाटल्या. ते मुंबईचे मालक झाले. मूळ रहिवाशांना हिणवत ते म्हणू लागले : मुंबई तुमची; भांडी घासा आमची.

Policies and Regulation, Risks, Environment, Development, Infrastructure, Protests
February 17, 2016

A clash of fishing nets

मासेमारीचे 'जाळ्या'तील वादळ

Risks, Environment, Protests, Policies and Regulation, Fishing